Entertainment News : अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्या लग्नाची मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. यातच आता हे जोडपे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. यासाठी जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे. विवाहासाठी दोघेही कुटुंबासह उदयपूरमध्ये दाखल झाले आहेत. उदयपूरमधील ‘द लीला पॅलेस या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. या लग्नसोहळ्याला अनेक राजकीय नेते आणि बॉलीवूड कलाकार उपस्थित राहणार असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र परिणीतीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) अद्याप भारतात आलेली नाही. अशातच तिने परिणीती साठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
प्रियांका चोप्राने बहीण परिणीतीचा एक खास फोटो शेअर केला आणि पोस्ट लिहीलीय , ‘मला आशा आहे की, तुम्ही तुमच्या या खास दिवशी तितकेच आनंदी आणि समाधानी असाल. मी तुमच्यावर नेहमीच प्रेम करते. एका नवीन सुरुवातीसाठी खुप शुभेच्छा.’ याशिवाय तिने राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांना रेड हार्ट इमोजीसह टॅग केले आहे. तिच्या या पोस्टवरून प्रियांका परिणीतीच्या लग्नाला हजर राहणार नसल्याची चर्चा रंगली आहे.
मागील काही दिवसांपासून प्रियांका मुलगी मालतीसोबत लग्नाला येणार असल्याचं बोललं जात होतं. निक जोनास येऊ शकणार नाही. मात्र आता प्रियांकाच्या टीमने याबाबत मौन पाळले असून अद्याप याबाबत कोणतीही स्पष्टता दिलेली नाही. मात्र प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा परिणीती-राघवच्या लग्नात सहभागी होण्यासाठी उदयपूरला पोहोल्या आहेत. परंतु प्रियांका लग्नाला उपस्थित राहणार की नाही? हेअद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
परिणीती आणि राघव उद्या 24 सप्टेंबरला विवाहबंधनात अडकणार आहेत. परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्यात नो फोन पॉलिसी असणार आहे. परिणीती आणि राघव पंजाबी रितीरिवाजांनुसार लग्नबंधनात अडकणार आहेत.