Entertainment News – अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर ‘टायगर 3’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करायला सज्ज झाला आहे. यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
असा दावा केला जात आहे की ‘टायगर’ फ्रँचायझीच्या तिसऱ्या पार्टमध्ये प्रेक्षकांना आवडणाऱ्या सर्व गोष्टी आहे. हा हाय ऑक्टेन फ्लिक अॅक्शनपासून साहसापर्यंत, विदेशी लोकेशन्सपासून ते अप्रतिम स्टंट्सपर्यंत आणि अर्थातच शाहरुख खानने पठाणच्या भूमिकेत केला आहे. त्याचवेळी, आता ‘टायगर 3’ च्या टीझर रिलीजबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. ( salman khan south movie )
अशात सलमान खान ‘मौजान ही मौजान’ चित्रपटाच्या लाँच पार्टीमध्ये म्हणाला की, मला साऊथ फिल्म इंडस्ट्रीत काम करायचे आहे. ‘मौजान ही मौजान’ या चित्रपटाने 1000 कोटी रुपयांपर्यंत कमाई करावी, असे सलमान खान म्हणाला. भाईजानने लकवरच साऊथ चित्रपटांमध्ये दिसणार असल्याची आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे, चाहते त्याच्या साऊथ चित्रपटांमध्ये काम करण्याच्या विधानाचे कौतुक करत आहे.
सलमान खानचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ पडद्यावर काही खास करू शकला नाही, त्यामुळे भाईजानलाही ‘टायगर 3’ कडून खूप अपेक्षा आहेत. रिपोर्टनुसार, ‘टायगर 3’चा टीझर येत्या काही दिवसांत रिलीज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सलमान खानच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास,सलमान लवकरच कतरिनसोबत ‘टायगर 3’ या चित्रपटात दिसणार आहे. ( salman khan south movie )