93व्या ऍकॅडमी अवॉर्डसच्या नॉमिनेशनची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. देशी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपला पती निक जोनास याच्यासोबत सोशल मीडियावर या कार्यक्रमाची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, प्रियांका चोप्राचा “द व्हाइट टायगर’ या चित्रपटास बेस्ट ऍडेप्टेड स्क्रीनप्लेसाठी नामांकित करण्यात आले आहे.
View this post on Instagram
यंदाचा ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा 25 एप्रिल रोजी पार पडणार आहे. प्रियांकाला जेव्हा नामांकन यादित आपल्या “द व्हाइट टायगर’चा समावेश असल्याचे समजले तेव्हापासून ती खूपच आनंदी आहे. यामुळे ती खूपच रोमांचीत झाली असून हा आनंद ती लपवू शकली नाही.
View this post on Instagram
प्रियांकाने ट्विट केले की, आम्ही आताच ऑस्करसाठी नॉमिनेट झालो आहे. रमीन यांना शुभेच्छा! स्वतःवर अभिमान असल्याचे जाणवत आहे. दरम्यान, “द व्हाइट टायगर’ चित्रपटास पाच वेगवेगळ्या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. या चित्रपटात प्रियांकासह अभिनेता राजकुमार रावने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक रमीन बहरानी यांना बेस्ट ऍडेप्टेड स्क्रीनप्लेसाठी नामांकित करण्यात आले आहे.