“नागिन’ अभिनेत्री मौनी रॉय ही आपल्या हॉट ऍण्ड बोल्ड फोटोंमुळे सतत प्रसिद्धीच्या झोतात असते. परंतु सध्या ती तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपासून मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांच्या संबंधाबाबत चर्चा रंगत आहे.
View this post on Instagram
मौनी रॉय आणि सूरज नांबियार हे लवकरच विवाह करणार असल्याचे समजते. मौनीच्या आईने सूरजच्या कुटुंबियांची भेटदेखील घेतली आहे. यामुळे मौनीच्या लग्नाबाबत पुन्हा एकदा चर्चा होत असून तिला वधुच्या वेषात पाहण्यासाठी चाहते पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
View this post on Instagram
मौनी रॉय आता सुरज सोबत असलेल्या नात्याला एक नाव देवू इच्छित आहे. ती सूरजसोबत खूपच आनंदात असून ती लवकरच या नात्याबाबत ठोस निर्णय घेणार आहे. तसेच मौनीच्या कुटुंबियांनीदेखील हे नाते स्वीकारले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, एकता कपूरच्या “नागिन’ या मालिकेतून मौनीला लोकप्रियता मिळाली होती. शिवान्याची भूमिका साकारणारी मौनी घराघरात पोहोचली. तसेच अक्षय कुमारच्या “गोल्ड’ चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते. ती लवकरच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या “ब्रह्मास्त्र’मध्येही झळकणार आहे.
View this post on Instagram