इटली – अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलीवूडसह हॉलीवूडमध्ये देखील उत्तम काम केले आहे. प्रियांका चोप्रा तिच्या हॉट लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकत्याच एका हॉटेल उद्घटनादरम्यानचा तिच्या लुकने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
गुरुवारी इटलीतील बुल्गारी हॉटेल रोमाच्या उद्घाटनात प्रियांका चोप्राची जबरदस्त एंट्री झाली. यावेळी तिने खास लुक केला होता. सध्या तिचा हा लुक चाहत्यांच्या देखील पसंतीस पडत आहे. या फोटोमध्ये प्रियांकाने पांढऱ्या रंगाचा गाऊन घातला आहे. हा गाउन प्लंजिंग व्हि नेकलाइने डिझाइन करण्यात आला होता. गाऊनमध्ये हाय स्लिट आणि फ्लोर-स्वीपिंग ट्रेल खुपच सुंदर दिसत होता.
या संपूर्ण लुकबरोबरच प्रियांकाची हेअरस्टाईल देखील हटके दिसत आहे. तिने केसांच्या दोन पोनी बांधल्या आहेत. तिचा हा लुक पाहून ‘ या हेअर स्टाइलमधील आम्ही तिचा हा लुक कधीच पाहिला नाही. खूप सुंदर दिसत आहे,’ सिंड्रेला दिसत आहे,’ अशा कमेन्ट नेटकरी करत आहे. प्रियांका चोप्रा आणि गायिका-अभिनेत्री जेंडया कोलमैन या आंतरराष्ट्रीय दागिन्यांच्या ब्रँड बुल्गारीच्या ब्रँड अॅम्बेसेडर आहेत.
View this post on Instagram
जागतिक व्यासपीठावर लक्झरी ब्रँडचे प्रतिनिधीत्व करणारी प्रियांका ही एकमेव भारतीय अभिनेत्री आहे. बुल्गारीचे सीईओ जीन क्रिस्टोफ बेबिन यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. दरम्यान, प्रियांका नुकतीच अॅक्शन सीरिज, ‘सिटाडेल’ आणि ‘लव्ह अगेन’ या रोमँटिक चित्रपटात दिसली होती. आता ती लवकरच फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे.