नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारी अध्यक्षांची घोषणा शरद पवार यांनी यावेळी केली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या गळ्यात कार्यकारी अध्यक्षपदाची माळ शरद पवारांनी टाकली आहे.
Sharad Pawar announces Praful Patel, Supriya Sule working presidents of NCP
— Press Trust of India (@PTI_News) June 10, 2023
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. दिल्लीत आयोजित कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी नव्या कार्यकारी अध्यक्षपदाच्या नावांची घोषणा केली . सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल हे नवे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. आगामी निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी या दोघांवर असणार आहे. सध्या तरी अजित पवार यांना कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. दोघांकडे देखील वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी देण्यात येणार आहे.
प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्यप्रदेश, गोवा आणि गुजरात झारखंड राजस्थान राज्यांची जबाबदारी असणार आहे. तर सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणा या तीन राज्यांची जबाबदारी पक्षाने सोपवली आहे.