लखनऊ : उत्तरप्रदेशात हापूडच्या चंडी या हिंदू मंदिरात एका मुस्लीम तरूणाने नमाज पढल्याची घटना धक्कादायक घडली होती. त्यानंतर दोन्ही समाजामध्ये वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. त्यावरून आता एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. अकरम असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
शनिवारी सकाळी चंडी माता मंदिरात अकरम या मुस्लीम तरूणाने नमाज पढल्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यानंतर नागरिकांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी सीसीटीव्ही तपासत अकरम नावाच्या तरूणाला ताब्यात घेतले आहे.
अधिक माहितीनुसार, पोलिसांनी अटक केल्यानंतर अकरम या तरूणाने, “मी आज घरातून निघालो आणि आज मंदिरात नमाज पढू असं माझ्या मनात आलं. कारण माझ्यासाठी मंदिर आणि मस्जीद एकच आहे.” असा जबाब पोलिसात नोंदवला आहे. तर दुसऱ्या धर्माच्या धार्मिक स्थळांवर जाऊन नमाज पढणे चुकीचं असल्याचे म्हणत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
तर अटक करण्यात आलेल्या तरुणाची अधिकची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसेच आरोपी विरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.