मुंबई – भारतीय संघातील क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्यावरील हल्ल्याप्रकरणी सपना गिल चर्चेत आली होती. याप्रकरणी (Sapna Gill) सपना गिलसह चौघांना आज जामीन मंजूर करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपींना मुंबई न्यायालयात हजर करण्यात आले.
या प्रकरणी पृथ्वी शॉ याचा मित्र आशीष यादव याने ओशिवारा पोलिसात सपना गिलसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी न्यायालयाने आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर चौघांनी जामीनासाठी अर्ज केला होता. या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी पार पडली.
हे ही वाचा…. भारतीय क्रिकेटर ‘पृथ्वी शॉ’ला महिलेकडून मारहाण; सोशल मीडियावर Video व्हायरल
पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र क्लबमध्ये गेले होते. यावेळी काही चाहत्यांसोबत हा वाद सुरु झाला. या प्रकरणात महिला चाहतीने पृथ्वी शॉकडे सेल्फी घेण्याचा आग्रह धरला होता. यादरम्यान एकदा सेल्फी घेतल्यानंतर चाहती आणि तिच्या मित्रांनी अजून एक सेल्फी घेण्यासाठी आग्रह धरला.
Jasprit Bumrah : आयपीएलद्वारे बुमराह करणार पुनरागमन; पण BCCI ने …
मात्र यावेळी पृथ्वीने नकार दिला. यानंतर सेल्फी घेणाऱ्या चाहत्यांनी पृथ्वी शॉ याच्या मित्राच्या गाडीवर हल्ला केला होता. या प्रकरणी सपना गिलसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.