पुणे – इंडीयन रेड क्रॉस सोसायटीच्या रास्ता पेठ रुग्णालयात नवीन अत्याधुनिक सिटी स्कॅन मशीनचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमासाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या सी. एस. आर. उपक्रमा अंतर्गत लाभलेल्या भरीव आर्थिक मदतीमुळे ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
या प्रसंगी DICCIचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री उद्योजक मिलिंद कांबळे, IIM जम्मू चेअरमन अजय नाखले, राजी श्रीनिवास, रेड क्रॉस संस्थेचे पुणे शाखा अध्यक्ष डॉक्टर विक्रम फाटक, उपाध्यक्ष माब्रीन नानावटी, प्रा. आर. व्ही. कुलकर्णी, उद्योजक अजय शिर्के यांसह संस्थेचे पदाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
सिटी स्कॅन सुविधा अत्यंत माफक दरात, ना तोटा ना नफा या तत्त्वावर सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. संस्थेने सर्व गरजू व्यक्तींना या सुविधा व अन्य वैद्यकीय सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.