बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्याने अनेक चित्रपटात विविधांगी भूमिका साकारत चाहत्यांची मने जिंकली आहेत. आता तो “छलांग’ चित्रपटातून पुन्हा चाहत्यांच्या भेटीला येत आहे.
यात तो एका शिक्षकाची भूमिका साकारणार आहे. राजकुमार रावने एका मुलाखतीत खुलासा केला की, चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्याआधी तो गुडगाव येथील एका शाळेत ड्रामा टिचर म्हणून काम करत होता.
तेव्हा गुडगावमध्ये नुकतेच कॉल सेंटर सुरू झाले होते आणि या कॉल सेंटरमध्ये माझे अनेक मित्र काम करत होते. परंतु माझे भाषेवर प्रभुत्व नव्हते.
तसेच कॉलेजमध्ये असताना मला अभिनयाची आवड असल्याने गुडगाव येथील केवी पब्लिक स्कूलच्या वार्षिक महोत्सवानिमित्त 1 नाटक केले. दरम्यान, हंसल मेहता द्वारा दिग्दर्शित लव फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत “छलांग’मध्ये राजकुमार रावसोबत नुसरत भरुचा मुख्य भूमिका साकारत आहे. यात त्यांच्यासोबत सौरभ शुक्ला, सतीश कौशिक, जीशन अय्यूब, इला अरुण आणि जतिन सरना आदी कलाकारांनी काम केले आहे. हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.