बॉलीवूडमधील ऍक्शन हीरो अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित “लक्ष्मी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री कियारा अडवाणीने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे नुकतेच नाव बदललेले नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये कियाराचा जबरदस्त लूक दिसून येत आहे.
अक्षय कुमारने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर “लक्ष्मी’चे पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत त्याने लिहिले की, आता प्रत्येक घरात येणार “लक्ष्मी’. 9 नोव्हेंबर रोजी कुटुंबीयांसोबत तयार राहा, असे म्हटले आहे.
अक्षयने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये कियाराचा लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे. तिच्या या लूकची सध्या सर्वत्र चर्चा आहे. अक्षय कुमारच्या लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाचे नाव काही दिवसांपूर्वीच बदलून “लक्ष्मी’ असे ठेवण्यात आले आहे. “कंचना’ या तामिळ चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. एका ट्रान्सजेंडर भूताने या चित्रपटात अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. चित्रपटाचे दिग्दर्शन राघव लॉरेन्सने केले आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे.