नवी दिल्ली : देशामध्ये कोरोना विषाणूने कहर केला आहे. तर कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाला संबोधित करणार आहे. रात्री ८ वाजता मोदी देशाला संबोधित करणार आहेत. यावेळी पंतप्रधान नेमके काय बोलणार आणि पुन्हा काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वैश्विक महामारी कोरोना वायरस के बढ़ते प्रकोप के संबंध में कुछ महत्वपूर्ण बातें देशवासियों के साथ साझा करूंगा। आज, 24 मार्च रात 8 बजे देश को संबोधित करूंगा।
Will address the nation at 8 PM today, 24th March 2020, on vital aspects relating to the menace of COVID-19.
— Narendra Modi (@narendramodi) March 24, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी ट्विट करत याविषयी माहिती दिली. ‘कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावासंदर्भात देशवासियांना काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे. २४ मार्चला रात्री ८ वाजता मी देशाला संबोधित करेल.’, तर, याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी देशाला संबोधित करत जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. मोदींनी आवाहन केलेल्या जनता कर्फ्यूला जनतेने चांगला प्रतिसाद दिला होता.
दरम्यान, सरकारकडून जनतेला वारंवार घरी थांबा, प्रवास करु नका, गर्दी टाळा असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र नागरिक सरकारच्या आदेशाचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. जनता कर्फ्यूच्या दुसऱ्या दिवशीच अनेक जण मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. त्यामुळे मोदींनी नाराजी व्यक्त करत ट्विट केले होते.