नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. हिराबेन यांना रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
यूएन मेहता रुग्णालय व्यवस्थापनाने मेडिकल बुलेटिन जारी करताना म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांना अहमदाबादमधील यूएन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
Heeraben Modi, mother of Prime Minister Narendra Modi is admitted at UN Mehta Institute of Cardiology & Research Centre in Ahemdabad and her health condition is stable, says the hospital pic.twitter.com/D6N4PF2FGC
— ANI (@ANI) December 28, 2022
दरम्यान, हिराबेन यांनी 18 जून रोजीच त्यांचा 100 वा वाढदिवस साजरा केला. तर, पंतप्रधान मोदींनी गुजरात निवडणुकीच्या दरम्यान गांधीनगरमध्ये आई हिराबेन यांची भेटही घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर रोजी गांधीनगरमध्ये आई हिराबेन यांची भेट घेतली होती. पंतप्रधान मोदींनी आईसोबत बराच वेळ गप्पाही मारल्या, नंतर त्यांनी आईच्या पायाल स्पर्श करत आशीर्वाद घेतले. त्यावेळी मोदी आणि त्यांच्या आईसोबतच्या भेटीचे फोटो समोर आले होते, ज्यामध्ये ते हिराबेनचे आशीर्वाद घेताना दिसले.
मोदींनी जवळपास 46 मिनिटे आईसोबत गप्पा मारल्या होत्या. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचे जुने चित्र त्यांच्या निवासस्थानातील भिंतीवर देखील आहे. हे पाहता पंतप्रधानांचे मातृप्रेम स्पष्ट होते.