नवी दिल्ली – राज्यातील बाधितांची संख्या वाढत असून, परिस्थिती आणखी चिंताजनक बनली आहे. गेल्या 24 तासांत 17 हजार 864 बाधित आढळले असून 87 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात एकूणच लॉकडाऊन होण्याची शक्यता या आकडेवारीवरून दिसून येत आहे. प्रत्येक जिल्ह्याने त्यांच्या स्तरावर निर्बंध कडक करण्याचे निर्णय घेतले आहेत. मात्र, संपूर्ण राज्यातच आता कडक निर्बंध लागू करण्यात येण्याची चिन्हे आहेत. करोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे राज्यासह देशात येत्या काळात दुसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे लसीकरणालाही देशभरात योग्य प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज व्हिडियो कॉन्फरद्वारे महाराष्ट्र राज्यसह इतर राज्यातील मुख्यमंत्रांशी ‘महत्वपूर्ण’ बैठक घेणार आहे.
या व्हिडियोमध्ये कॉन्फर बैठकीमध्ये करोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येला रोखण्यासाठी कशा प्रकारचे निर्बंधने आणता येईल यावर चर्चा होणार आहे. आज सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. देशातील कोरोनाची स्थिती आणि लसीकरणाची स्थिती या विषयावर मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत.
देशात कोरोनाचे लसीकरण सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच मोदी या विषयावर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या पाच राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. गेल्या 24 तासांत या राज्यांमधून 79.73 टक्के नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
दरम्यान, करोनाविषयक सुरक्षेच्या सूचना डावलल्याचे परिणाम युरोपमधील अनेक देश भोगत आहेत. त्यांना दुसऱ्यांदा लॉकडाऊन जाहीर करावे लागले. अशीच काहीशी परिस्थिती दिल्लीत उद्भवली असून दिल्लीत करोनाचे रुग्ण वेगाने वाढू लागले आहेत.