पुणे – विभागीय आयुक्त सौरभ राव यांचा करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सद्य:स्थितीत ते गृह विलगीकरणात आहे. दरम्यान, विभागीय आयुक्तांकडे करोना नियंत्रणाची महत्त्वाची जबाबदारी आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयात अनेक बैठका होत असल्याने अनेक वरिष्ठ अधिकारी या बैठकीत उपस्थित असतात. दरम्यान, शुक्रवारीच (दि.16) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करोनाचा आढावा घेतला.
या बैठकीत विभागीय आयुक्तांसह दोन्ही मनपाचे आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापौर यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त राव यांचा मंगळवारी दुपारी करोना चाचणीचा पॉझिटिव्ह अहवाल आला. याआधी राव यांच्या बंगल्यावरील दोन शिपाई तसेच ड्रायव्हर सुद्धा बाधित आढळून आले आहेत.