नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 एप्रिल 2022 रोजी रात्री 9:15 वाजता नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर श्री गुरू तेग बहादूरजींच्या 400 व्या प्रकाश पर्व सोहळ्यात सहभागी होतील. ते या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करतील आणि गुरुंच्या स्मरणार्थ नाणे आणि टपाल तिकीटही जारी करतील. अशी माहिती पंतप्रधान कार्यालयातून देण्यात आली आहे.
दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने केंद्र सरकारने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या दोन दिवसीय (20 आणि 21 एप्रिल) कार्यक्रमात देशाच्या विविध भागातील रागी आणि मुले ‘शबद कीर्तन’मध्ये सहभागी होतील. गुरू तेग बहादूरजी यांच्या जीवनाचे चित्रण करणारा भव्य प्रकाश आणि ध्वनी सोहळा देखील यावेळी होणार आहे. याशिवाय शिखांची पारंपरिक युद्धकला (मार्शल आर्ट) ‘गटका’चेही आयोजन केले आहे.
जगाच्या इतिहासातील धर्म आणि मानवी मूल्ये, आदर्श आणि तत्त्वांचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे नववे शीख गुरू, गुरू तेग बहादूरजी यांच्या शिकवणुकीवर हा कार्यक्रम प्रकाश टाकणार आहे.