Sanjay Raut | narendra modi | Lok Sabha Election 2024 – देशात इंडिया आघाडीच विजयाच्या मार्गावर असून या आघाडीला किमान ३०५ जागा मिळतील महाराष्ट्रात आम्ही महाविकास आघाडी ३५ पेक्षा अधिक जागा जिंकू असा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.
फडणवीस भाजपला ४५ पेक्षा अधिक जागा मिळत आहेत असं म्हणत आहेत, पण त्यांना आकडे लावायची सवय आहे. निवडणुकीनंतर त्यांना हाच धंदा सुरू करावा लागेल असा टोमणाही त्यांनी मारला आहे. । Sanjay Raut | narendra modi | Lok Sabha Election 2024
ते म्हणाले की आम्ही महाविकास आघाडी एकजुट आहोत. शिवसेना कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस असा आता आमच्यात विषयच राहिलेला नाही. त्यामुळी ही आघाडी विजयाच्या मार्गावर वाटचाल करीत आहे असे राऊत यांनी नमूद केले.
ते म्हणाले की रामटेकला आमचा उमेदवार नाही, पण आम्ही तेथे प्रचाराला सुरूवात केली आहे. तेथे आम्ही शिवसैनिकांच्या बैठका घेत आहोत असेही त्यांनी नमूद केले.
ओपिनियन पोल मधून काहीही अंदाज वर्तवले जात असले तरी आम्ही शंभर टकके विजयाच्या मार्गावर आहोत असा दावाही त्यांनी केला. ते म्हणाले की, आम्ही चारशेपार असे म्हणणा नाही पण किमान ३०५ जागा जिंकू असा विश्वास त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.