पुणे – मार्केट यार्डात पालेभाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे मागील पंधरा दिवसांपासून वाढलेले भाव आवाक्यात आले. मुळे आणि कांदापातच्या भावात किंचित तेजी असली तरी उर्वरित पालेभाज्यांचे भाव आवाक्यात आले आहेत. रविवारी कोथिंबीरची तब्बल अडीच लाख जुडी, तर मेथीची 1 लाख जुडी इतकी आवक झाली.
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी)
कोथिंबीर : 200-800, मेथी : 600-1200, शेपू : 500-800, कांदापात : 1000-1200, चाकवत : 700-800, करडई : 600-800, पुदिना : 400-500, अंबाडी : 700-800, मुळे : 1000-1200, राजगिरा : 500-700, चुका : 800-1000, चवळई :700-800, पालक : 500-700.