price of chilli – शेतकऱ्यांच्या एका गटाने सोमवारी संध्याकाळी कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय पेटवून दिले. या मार्केट कमिटीतब्याडगी मिरचीच्या भावात अचानक मोठी घसरण झाल्याने त्याचा राग तेथील शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने काढला. । price of chilli
अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, संतप्त शेतकऱ्यांनी पोलिस व्हॅनसह अन्य वाहने जाळली आणि परिसरातील दुकानांची तोडफोड केली. या घटनेत किमान तीन दुकाने जळून खाक झाली असून एक जण जखमी झाला आहे.
दरम्यान, कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर अशोक यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारवर ‘शेतकरी विरोधी धोरणे’ राबवल्याचा आरोप केला. । price of chilli
“हवेरी येथे संतप्त शेतकऱ्यांनी एपीएमसी कार्यालयावर हल्ला करून वाहने जाळल्याची घटना हा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा आणि दुष्काळी परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यात उदासीन वृत्तीचा थेट परिणाम आहे, असे ते म्हणाले. । price of chilli