Mumbai vs Vidarbha (MUM vs VID) Ranji Trophy 2023-24 Final, 3rd Day : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 41 वेळची चॅम्पियन मुंबई आणि दोन वेळचा चॅम्पियन विदर्भ यांच्यात रणजी ट्रॉफीचा जेतेपदाचा सामना खेळला जात आहे. विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात 224 धावा केल्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा पहिला डाव 105 धावांत आटोपला.
मुंबईने आपल्या दुसऱ्या डावात 7 गडी गमावत 365 धावा केल्या आहेत. सध्या शम्स मुलाणी (15) आणि तनुश कोटियान (01) क्रीजवर आहेत.
WICKET! Over: 109.6 Shardul Thakur 0(1) b Harsh Dubey, Mumbai 357/7 #MUMvVID #RanjiTrophy #Elite #Final
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 12, 2024
त्याआधी, पृथ्वी शॉ 11 धावा केल्यानंतर, भूपेन लालवानी 18 धावा केल्यानंतर, अजिंक्य रहाणे 73 धावा केल्यानंतर, श्रेयस अय्यर 95 धावा केल्यानंतर, हार्दिक तामोर पाच धावा करून आणि मुशीर खान 136 धावा करून बाद झाला. यासह मुंबईने 484 धावांची आघाडी घेतली आहे.