President’s Office – भारताचे राष्ट्रपती हे सर्वोच्च संविधानिक पद आहे. राष्ट्रपती पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीचा मानमरताब, त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा यांबाबत सामान्य लोकांना आकर्षण असते.अशातच यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये राष्ट्रपतींसाठी करण्यात आलेल्या आर्थिक तरतुदीचा आकडा वाचून अनेकांचे डोळे विस्फारतील.
यंदाचा अर्थसंकल्प आज (गुरुवार) मांडण्यात आला. निवडणूक वर्ष असल्याने संपूर्ण अर्थसंकल्प न मांडता अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. अर्थसंकल्पातून राष्ट्रपतींच्या कर्मचारी, घरगुती खर्च आणि भत्ते यांसाठी तब्बल १४४.८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
गतवर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये ९७.६९ कोटींची तरतूद करण्यात आली होती. यंदा त्यामध्ये ४६.४९ कोटींची भरीव वाढ करण्यात आली आहे.
कशासाठी किती तरतूद? | President’s Office
मंजूर करण्यात आलेल्या रकमेपैकी ९०.८७ कोटी राष्ट्रपतींच्या सचिवालयासाठी तर ५२.७१ कोटी इतर खर्चांसाठी मंजूर करण्यात आले आहेत. इतर खर्चांमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारांसह राष्ट्रपती भवनाचा खर्चही करण्यात येतो.
राष्ट्रपतींच्या वेतनासाठी किती तरतूद? | President’s Office
राष्ट्रपती यांच्या वेतनासाठी ६० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. गतवर्षीही राष्ट्रपतींच्या वेतनासाठी इतकीच रक्कम मंजूर करण्यात आली होती.