शिक्रापूर:पार्किंगची पाहणी करताना प्रांताधिकारी स्नेहा देवकाते यांसह अधिकारी.
शिक्रापूर -एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे होणारा शौर्य दिन एक महिन्यावर येऊन ठेपलेला असल्याने प्रत्येक विभागाने कामाला लागून योग्य ती तयारी सुरु करावी व एक जानेवारी रोजी होणारा शौर्यदिनाचा कार्यक्रम शांततेत व सुयोग्य नियोजनात पार पडेल यासाठी कामाला लागावे, असे प्रांताधिकारी स्नेहा देवकाते यांनी सांगितले.
कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी 2018 रोजी झालेल्या दंगलीनंतर प्रशासनाने योग्य खबरदारी घेतलेली असताना प्रत्येक वर्षी प्रशासनाकडून या कार्यक्रमाची विशेष तयारी करण्यात येते. नुकतीच शिक्रापूर येथे एक जानेवारी 2024 रोजी होणार्या शौर्य दिनाच्या कार्यक्रमाची आढावा बैठक प्रांताधिकारी स्नेहा देवकाते यांच्या उपस्थितीत झाली.
यावेळी शिरुर विभागाचे प्रांताधिकारी हरिष सूळ, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, गटविकास अधिकारी महेश डोके, विस्ताराधिकारी रामेश्वर राठोड, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दामोदर मोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता रणजीत दाइंगडे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे, बाळनाथ पवणे, बापूसाहेब गोरे, सरपंच रमेश गडदे, तलाठी सुशीला गायकवाड, अश्विनी कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, पोलीस हवालदार संदीप कारंडे, पोलीस पाटील मालन गव्हाणे, जयसिंग भंडारे यांसह आदी उपस्थित होते.
दरम्यान प्रांताधिकारी यांनी सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांच्या उपस्थितीत कोरेगाव भीमा ते शिक्रापूर येथील ठिकठिकाणी होणार्या पार्किंगसह आदी ठिकाणांची पाहणी केली. आरोग्य व महसूल विभागाच्या कामांची माहिती घेत प्रत्येक विभागाला त्यांच्या कामाचे आदेश दिले असून पार्किंगच्या ठिकाणी विविध उपाययोजना करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे.
शिक्रापूर ःपार्किंगची पाहणी करताना प्रांताधिकारी स्नेहा देवकाते यांसह अधिकारी.