करोना महामारीमुळे बॉलीवूडसह सर्व इंडस्ट्री बंद आहे. तीन महिन्यानंतर आता हळूहळू सर्वकाही सुरू करण्यात येत असून काही निर्बंधांसह शूटिंगलाही परवानगी देण्यात आली आहे. याच दरम्यान बी-टाऊन इंडस्ट्रीमधील युवा स्टार्स ईशान खट्टर आणि अनन्या पांडे हे चक्क पीपीई किट घातले असल्याचे विमानतळावर स्पॉट करण्यात आले आहे.
ईशान आणि अनन्या हे दोघेजण आपल्या आगामी ‘खाली पीली’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठीची रणनीती ठरविण्यासाठी गोव्याला चालले आहेत. याप्रसंगी दोघेजण मास्क फेस कवर, ग्लव्स आणि बॉडी किटमध्ये असल्याचे दिसून आहे. ज्यामुळे या दोघांना ओळखणे कठीण झाले होते. विशेष म्हणजे ईशान-अनन्याची जोडी पहिल्यांदाच सिल्वर स्क्रिनवर झळकणार आहे.
ईशानने काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा फर्स्ट लुकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यामधील लुकमध्ये ईशान खूपच हॅंडसम दिसत होता. यात सुशांत एका टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका साकारत आहे.
दरम्यान, ईशान आणि अनन्या यांनी बॉलीवूडमध्ये धमाकेदार डेब्यू केले होते. ईशानने जानव्ही कपूरसोबत ‘धडक’, तर अनन्याने तारा सुतारिया आणि टायगर श्रॉफसोबत ‘स्टूडेंट ऑफ द इयर-2’मधून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते.