English Premier League 2023-24 : स्ट्रायकर ज्युलियन अल्वारेझच्या दोन गोलच्या जोरावर मँचेस्टर सिटीने इंग्लिश प्रीमियर लीग (ईपीएल) सामन्यात बर्नलेचा 3-1 असा पराभव केला. सिटी संघाने या स्पर्धेतील सलग आठवा विजय नोंदवला तर बर्नलेविरुद्धचा हा त्याचा सलग 13वा विजय ठरला.
मँचेस्टर सिटीकडून ज्युलियन अल्वारेझने 16व्या आणि 22व्या मिनिटाला गोल केले. अल्वारेझला दुसरा गोल करण्यास ब्रूनने मदत करत महत्वपूर्ण कामगिरी केली. दरम्यान, अल्वारेझ त्याच्या वाढदिवशी EPL मध्ये दोन किंवा अधिक गोल करणारा 10वा खेळाडू ठरला. तर रॉड्रिने 46व्या मिनिटाला फिल फोडेनच्या पासवर सिटीसाठी सामन्यातील तिसरा गोल केला. त्याच वेळी, बर्नलेसाठी एकमेव गोल अमीन अल दाखिलने सामन्याच्या दुखापती वेळेच्या (Injury Time) 90+3 व्या मिनिटाला केला, परंतु तो केवळ पराभवाचे अंतर कमी करू शकला.
Man City make it four consecutive wins in the Premier League 💪#MCIBUR pic.twitter.com/A5pZ8OBZzq
— Premier League (@premierleague) January 31, 2024
या सामन्याव्दारे सिटीचा महत्त्वाचा स्ट्रायकर एर्लिंग हॅलँड हा जवळपास दोन महिन्यांनंतर संघात परतला. दुखापतीमुळे तो मैदानापासून दूर होता. सामन्यात 71व्या मिनिटाला केविन डी ब्रूनच्या जागी एर्लिंग हॅलँड मैदानात आला.
लिव्हरपूलने केला चेल्सीचा पराभव
ईपीएलच्या आणखी एका सामन्यात लिव्हरपूलने आपली उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवत चेल्सीचा 4-1 असा पराभव केला. लिव्हरपूलसाठी डिएगो जोटा (23वे मिनिट), कॉनर ब्रॅडली (39वे मिनिट), डॉमिनिक झ्बोस्ली (65वे मिनिट) आणि लुईस डायझ (79वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक-एक गोल केला. त्याचवेळी क्रिस्टोफर एनकुंकूने (71व्या मिनिटाला) चेल्सीसाठी एकमेव गोल केला.
English Premier League 2023-24 : नॉटिंगहॅमला हरवून आर्सेनलची दुसऱ्या स्थानी झेप…
यावेळी सिटी आणि लिव्हरपूल यांच्यात विजेतेपदासाठी स्पर्धा आहे. लिव्हरपूल 51 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. त्याचवेळी मँचेस्टर सिटी आणि आर्सेनलचे 46 गुण आहेत. गोल फरकात आघाडीवर असल्याने मँचेस्टर सिटी दुसऱ्या क्रमांकावर आहे.