Premier League AVL vs ARS : या आठवड्यात प्रीमियर लीगमध्ये मोठा सामना खेळवला जाणार आहे. प्रथम क्रमांकाचा आर्सेनल फुटबॉल क्लब तिस-या स्थानावर असलेल्या ऍस्टन व्हिलाशी स्पर्धा करेल. दोन्ही संघांमध्ये केवळ चार गुणांचा फरक आहे. अशा स्थितीत हा सामना खूपच रोमांचक होण्याची शक्यता आहे.
आर्सेनल फुटबॉल क्लबने आतापर्यंत प्रीमियर लीगच्या 15 पैकी 11 सामने जिंकले आहेत आणि 36 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. दुसरीकडे, अॅस्टन व्हिला क्लब तब्बल 10 सामन्यांत विजय मिळवून 32 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. अॅस्टन व्हिला येथे जिंकल्यास या दोन संघांमध्ये केवळ एका गुणाचे अंतर असेल.
गेल्या वेळी आर्सेनल संघाचे प्रीमियर लीगचे जेतेपद थोडक्यात हुकलं होते. गेल्या मोसमात, बराच काळ अव्वल राहिल्यानंतर, अखेरीस जेतेपदाच्या सामन्यात मँचेस्टर सिटीकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. यावेळी पुन्हा आर्सेनलकडे आघाडी कायम ठेवण्याची चांगली संधी आहे.
अॅस्टन व्हिलाने यावेळी धक्कादायक कामगिरी केली आहे. बऱ्याच दिवसांनी असा अप्रतिम खेळ या क्लबकडून पाहायला मिळाला आहे. परिस्थिती अशी आहे की, हा फुटबॉल क्लब सध्या मँचेस्टर सिटी, युनायटेड, टॉटनहॅम आणि चेल्सीसारख्या अनेक फुटबॉल क्लबच्या पुढे आहे. लिव्हरपूल आणि व्हिला यांच्यात फक्त दोन गुणांचा फरक आहे.
आर्सेनल विरुद्ध अॅस्टन व्हिला सामना कुठे खेळला जाईल?
अॅस्टन व्हिलाचे बर्मिंगहॅममधील होम ग्राउंड म्हणजे ‘विला पार्क’वर हा सामना खेळवला जाईल.
हा मोठा सामना कधी होणार?
हा सामना शनिवारी (9 डिसेंबर) रात्री 11 वाजता सुरू होईल.
तुम्ही लाइव्ह टेलिकास्ट/स्ट्रीमिंग कुठे पाहू शकता?
या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या ‘सिलेक्ट एचडी’ वाहिनीवर केले जाईल. लाइव स्ट्रीमिंग Disney+Hot Star वर उपलब्ध असेल.