English Premier League 2023-24 : इंग्लिश प्रीमियर लीग (ईपीएल) मध्ये आर्सेनलने नॉटिंगहॅम फॉरेस्टचा 2-1 असा पराभव केला. या विजयासह मिकेल अर्टेटाचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या प्रशिक्षणाखाली आर्सेनलने या मोसमात 22 पैकी 14 सामने जिंकले आहेत. चार सामने अनिर्णित राहिले आणि तेवढ्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.
आर्सेनलच्या विजयात ब्राझीलचा गॅब्रिएल जीसस आणि इंग्लंडचा बुकायो साका यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 65व्या मिनिटाला जीससने तर साकाने 72व्या मिनिटाला गोल केला. नॉटिंघमसाठी एकमेव गोल ताइवो अवोनी याने 89व्या मिनिटाला केला.
लिव्हरपूल पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. ते आर्सेनलपेक्षा एक सामना कमी खेळले आहेत. लिव्हरपूलचे 21 सामन्यांत 48 गुण आहेत. आर्सेनलपेक्षा हे दोन गुण अधिक आहेत. लिव्हरपूलने 21 पैकी 14 सामने जिंकले आहेत. त्यातील सहा सामने अनिर्णित राहिले असून एक पराभव पत्करावा लागला आहे.
Indian Open Race Walking Competition 2024 : मंजू राणीने पटकावले सलग दुसरे सुवर्णपदक…
मँचेस्टर सिटी 43 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचवेळी न्यूकॅसलविरुद्धच्या पराभवानंतर ॲस्टन व्हिला चौथ्या स्थानावर आहे. त्याच्या खात्यात 43 गुण आहेत. मँचेस्टर सिटीने 20 सामने खेळले आहेत आणि ॲस्टन व्हिलाने 22 सामने खेळले आहेत.
न्यूकॅसलची ॲस्टन व्हिलावर मात…
दुसरीकडे, ॲस्टन व्हिलाची फेब्रुवारी 2023 पासून घरच्या मैदानावर न हारण्याचा सिलसिला तुटला. न्यूकॅसलने त्यांचा 3-1 असा पराभव केला. व्हिला पार्क येथे 346 दिवसांत सामना जिंकणारा न्यूकॅसल पहिला संघ ठरला. ॲस्टन व्हिलाचा घरच्या मैदानावर शेवटचा पराभव आर्सेनलविरुद्ध झाला होता.