Zarkhand CM Oath – लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. देशभरातील राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. झारखंडमध्ये मात्र मोठी राजकीय उलथापालथ घडली आहे. हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून चंपाई सोरेन यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आजच (शुक्रवार) चंपाई सोरेन यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. एकीकडे चंपाई यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असतानाच झारखंड मुक्ती मोर्चा व काँग्रेस आमदारांना हैदराबादेत हलवण्यात आले आहे.
येथे एका रिसॉर्टमध्ये त्यांना ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. नवनिर्वाचित मुख्यमंत्री सोरेन यांना, १० दिवसांमध्ये बहुमत चाचणीस सामोरे जायचे आहे. त्यापूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व आमदारांना हैदराबादला हलवण्यात आले आहे.
सुमारे 40 आमदार दोन फ्लाइटने हैद्राबाद येथील बेगमपेट विमानतळावर पोहोचले. येथून तेलंगणा काँग्रेसच्या प्रभारी दीपा दास मुन्शी आणि राज्याच्या परिवहन मंत्री पोन्नम प्रभाकर यांनी आमदारांना विमानतळावरून पुढील ठिकाणी घेऊन जाण्याची व्यवस्था पाहिली.
#WATCH | Telangana: Jharkhand JMM & Congress MLAs arrived in Hyderabad. They are being taken to a resort.
JMM’s Champai Soren took oath as the CM of Jharkhand today. He will have to prove his majority in a floor test to be held in the next 10 days. pic.twitter.com/U2c4Ki2Suo
— ANI (@ANI) February 2, 2024
राज्यात सत्ता उलथवण्याचा प्रयत्न? । Zarkhand CM Oath
झारखंड मुक्ती मोर्चा व काँग्रेसचे सरकार सध्या सत्तेत आहे. हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आल्यानंतर दोन्ही पक्षाच्या आमदारांच्या घोडेबाजाराचा प्रयत्न भाजपतर्फे केला जाऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर या आमदारांना काँग्रेस सत्तेत असलेल्या तेलंगणामध्ये हलवण्यात आलं आहे.
५ फेब्रुवारीला बहुमत चाचणी | Zarkhand CM Oath
झारखंडमधील चंपाई सोरेन यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार 5 फेब्रुवारी रोजी बहुमत चाचणीस सामोरे जाणार आहे, अशी माहिती मंत्री आलमगीर आलम यांनी शुक्रवारी कॅबिनेट बैठकीनंतर दिली.