नवी दिल्ली – उत्तरार्धात कर्णधार व्हिन्सेंट कोम्पनीने केलेल्या एकमेव गोलमुळे मॅंचेस्टर सिटीने लिसेस्टर सिटीवर 1-0 अशी मात केली. या विजयामुळे मॅंचेस्टर सिटी हा प्रीमियर लीग विजेतेपदापासून केवळ एक विजयाच्या अंतरावर पोहोचला आहे.
यावेळी सामन्याच्या सुरूवाती पासूनच दोन्ही संघ एकमेकांवर हल्ला चढवत होते. मात्र, दोन्ही संघांच्व्या बचावपटूंनी उत्तम कामगिरी करत गोल करत प्रतिस्पर्ध्यांना गोल पोस्ट कडे जाण्यापसून रोखण्यात यश मिळवल्याने पहिल्या सत्रात एकही गोल झाला नाही.
यावेळी दुसऱ्या सत्रातही पहिल्या सत्रा प्रमाणेच खेळ झाला. मात्र, सामना संपण्यास 20 मिनिटे बाकी असताना कोम्पनीने दुरून साकारलेला अफलातून एकमेव गोल निर्णायक ठरला. यावेळी मॅंचेस्टर सिटीचा संघ ब्रायटनला होणाऱ्या सामन्यात विजय किंवा बरोबरी साधल्यास देखील विजेतेपदाला गवसणी घालू शकतात.