Bollywood : बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु लग्नानंतर तिने चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले होते. आता मोठ्या ब्रेकनंतर प्रीती पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे प्रीती अभिनेता सनी देओलसोबत बॉलीवूड सिनेमामध्ये काम करणार आहे.
‘लाहोर 1947’ या चित्रपटातून प्रीती प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती अमिर खान करणार आहे. नुकतेच तिने ‘लाहोर 1947’ चित्रपटासाठी लूक टेस्टही दिली असल्याची माहिती समोर आली आहे. या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये धमाकेदार पुनरागमन करणार असल्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होते. मात्र अद्याप या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झालेली नाही. ‘गदर 2’ च्या यशानंतर सनी देओल अनेक चित्रपट मिळाले असून यातील एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये तो व्यस्त आहे. त्यानंतर तो ‘लाहोर 1947’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.
दरम्यान, प्रीती झिंटा ‘इश्क इन पॅरिस’ चित्रपटात शेवटची दिसली होती. त्यानंतर आता चाहते देखील तिला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यास उत्सुक आहेत. यापूर्वी सनी आणि प्रीतीने ‘हिरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’,’भैयाजी सुपरहिट’ आणि ‘फर्ज’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
प्रीती झिंटा बऱ्याच दिवसांपासून मोठ्या स्क्रिनपासून लांब असली तरी ती सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते आणि चाहत्यांना आपल्याबाबत अपडेट देत असते. मात्र आता तिच्या बॉलीवूड पदार्पणची बातमी समोर येताच चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.