प्रिती झिंटाने सलमान खानबरोबरचे आपले काही फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमुळे तिचे फॅन्स बुचकळ्यातच पडले आहेत. यातील सलमानच्या अंगावर पोलिस युनिफॉर्म आहे. याच फोटोमध्ये प्रिती झिंटाच्या अंगावर निळ्या रंगाचे जॅकेट आहे, त्याच्या पाठीवर “पोलिस’ असे लिहीले आहे. त्यामुळे हा फोटो “दबंग 3’मधील आहे, हे लगेच लक्षात येते.
पण “दबंग 3’मध्ये प्रिती झिंटाही आहे, हे आताच समजते आहे. याच छोट्या रोलबाबतचे सूतोवाच प्रिती झिंटाने केले आहे. तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये तसे काहीच स्पष्टपणे सांगितलेले नाही. केवळ “दबंग 3’च्या सेटवर खूप मस्ती करते आहे, असेच म्हटले आहे.
तिच्या या कॅप्शनमुळे कन्फ्युजन आणखीनच वाढले आहे. ती केवळ सेटवर मौजमजा करायला आली होती की खरोखरच “दबंग 3’मध्ये तिचा छोटासा रोल आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
जर तिचा खरेच छोटासा रोल असेल, तर सलमानने आतापर्यंत त्याबद्दल काहीच कसे सांगितले नाही, हा देखील एक प्रश्न आहेच. पण जर प्रितीही “दबंग 3′ मध्ये असेल, तर तिच्या वाट्याला असा कोणता रोल आला आहे?