मान्सूनपूर्व पावसाने नगरला झोडपले

पहिल्याच पावसात वीजपुरवठा खंडित; नागरिक उकाड्याने हैराण

नगर  -नगर जिल्ह्याच्या विविध भागाला वादळी पावसाचा तडाखा बसला. या पावसाने नेवासे, नगर, राहुरी भागातील पिकांना फटका बसला असून, फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, खरिपाच्या दृष्टीने हा पाऊस चांगला झाला आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने दक्षिण व उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली होती.

रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला हा पाऊस सोमवारी सकाळपर्यंत सुरूच होता. नगर शहरासह अनेक तालुक्‍यांत जोरदार वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात चांगलाच उकाडा निर्माण झाला होता. त्यात वीजपुरवठां खंडित झाल्याने नगरकरांना उकाड्याने चांगलेच हैराण केले होते.

नगर तालुक्‍यातील निंबळक, टाकळी खातगाव, एमआयडीसी आदी भागातही जोरदार पाऊस झाला. तसेच नेवासे, राहुरी तालुक्‍यात वादळी पावसाने उसाच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. सध्या शेतात ऊस मोठ्या प्रमाणावर आहे. या पिकालाच चांगला फटका बसला. नगर शहर परिसरात रविवारी रात्री जोरदार वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात चांगलाच उकाडा निर्माण झाला होता.

त्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने नगरकरांना उकाड्याने चांगलेच हैराण केले होते. तसेच नगर शहरासह अनेक तालुक्‍यांत त्याच दरम्यान पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचा दाणादाण उडाली होती. शहरात या वादळी पावसामुळे काही भागात झाडे उन्मळून पडली होती. त्यामुळे फळबागांना या अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. शहरात झालेल्या या पावसाने रस्ते जलमय झाले. सखल भागात पाणी साचले होते. पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशाही पल्लवीत झाल्या आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार प्रमुख्याने कोकणात आणि मध्यमहाराष्ट्रात बहुतांश ठिकांनी पुढील तीन ते चार दिवस वादळी पाऊस होइल. नगर जिल्ह्यात पावसादरम्यान सोसाट्याचा वारा वाहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.