नगर – करोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये भिंगार छावणी परिषद येथील बाजारतळ मधील दुकाने दोन ते तीन महिन्यापासून बंद आहेत. बाजारतळ उघडण्याच्या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने छावणी परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. पवार यांनी शुक्रवार (दि.5) पासून आठवडे बाजार न भरवता दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाणार आहे.
केंद्र व राज्यसरकारच्या निर्देशानुसार अनेक व्यापारी व उद्योजकांना सवलती मिळून त्यांचे व्यवसाय पूर्ववत सुरु झाले आहेत. मात्र, भिंगार छावणी मधील बाजारतळचे दुकाने आजही बंद अवस्थेत आहे. यामुळे येथील दुकानदार व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आ.जगताप यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हा संघटक मतीन सय्यद यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने छावणी परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांची भेट घेत चर्चा केली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी शुक्रवार (दि.5) पासून आठवडे बाजार न भरवता दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात येणार आहे. दुकानदार व ग्राहकांना फिजीकल डिस्टन्सच्या नियमाचे पालन करुन मास्क आणि सॅनीटायझरचा वापर वापर करण्याचे स्पष्ट केले. यावेळी कलीम शेख, संजय सपकाळ, सुरेश मेहतानी, संजय खताडे, मतीन ठाकरे, पियुष भंडारी, सागर भुजबळ, मुसद्दिक सय्यद, दीपक लिपाने, आसिफ शेख, नूर शेख, संजय बाबर, नितीन लिपारे, दत्तात्रय खेतमाळस, सुनील पानसरे, सुमन कुठे, नीलेश भोसले, सुनील साळुंखे, सीताराम पोतकुळे उपस्थित होते.