पुण्यात लॉकडाऊन शिथिल; परिणाम उलटा

पुणे -चौथ्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली. ज्या भागात करोनाचे रुग्ण आढळत नाहीत. त्या परिसरातील अनेक व्यवहार सुरुळीत सुरू झाले. मात्र, शहरातील कंटेन्मेंट क्षेत्राबाहेर गेल्या 15 दिवसांत तब्बल 1 हजार 450 करोनाग्रस्त आढळले. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या, असे आवाहन महापालिका आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत केले आहे.

विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम्‌ पत्रकार परिषदेत सहभागी झाले होते. चौथा लॉकडाऊन जारी करताना ज्या भागात रुग्ण नाहीत, त्या भागातील काही प्रमाणात सूट देण्यात आली. त्यामुळे नागरिकही मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. त्याचा उलटा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. रुग्ण संख्या वाढू नये, यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.