सीबीआयच्या प्रभारी प्रमुखपदी प्रविण सिन्हा

नवी दिल्ली – सीबीआयचे अतिरिक्‍त संचालक प्रविण सिन्हा यांची सीबीआयच्या प्रभारी अध्यक्षपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. ऋषी कुमार शुक्‍ला यांच्या पश्‍चात सीबीआयचे अध्यक्ष कोणाला करायचे याबाबतचा निर्णय होईपर्यंत सिन्हा सीबीआयचे प्रभारी अध्यक्ष असणार आहेत. 

ऋषी कुमार शुक्‍ला हे दोन वर्षांच्या मर्यादित मुदतेनंतर बुधवारी निवृत्त झाले.प्रविण सिन्हा हे गुजरातमधील 1988 सालच्या तुकडीतील भारतीय पोलीस दलातील अधिकारी आहेत.

सीबीआयच्या अध्यक्षपदाच्या व्यक्‍तीची निवड करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सिन्हा यांची निवड केली आहे. सिन्हा यांच्या नियुक्‍तीबाबत कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयाने आदेश जारी केले आहेत.

ऋषी कुमार शुक्‍ला यांच्या दोन वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये फरार आर्थिक गुन्हेगार विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाबाबत लंडनमधील न्यायालयातील कायदेशीर लढाईचा निकाल भारताच्या बाजूने लागला होता. 

तसेच इंटरपोलची 2022 मध्ये होणाऱ्या आमसभेचे यजमानपदही भारताला मिळाले. याच वर्षी भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवदेखील आहे. शुक्‍ला यांच्याच कारकिर्दीत डार्कवेबवरील बाल लैंगिक शोषणाच्या व्हिडीओचे रॅकेटचा पर्दाफाश सीबीआयने केला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.