मुंबई – शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छापा टाकला आहे. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचे पथक पोहोचले आहे. यानंतर विहंग सरनाईक यांना ईडीने ताब्यात घेतले आहे.
“ज्यांनी चूक केली नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही”
मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकण्यात आला आहे. एकूण १० ठिकाणी धाड टाकण्यात आली असून सरनाईक यांचे चिरंजीव विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावरही छापे मारण्यात आले आहेत. तब्बल चार तासांच्या चौकशीनंतर ईडीने अखेर विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतले. त्यांना अधिक चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेण्यात आल्याचे समजत आहे.
प्रताप सरनाईक काही साधू संत नाहीत – नारायण राणे
Maharashtra: Enforcement Directorate officials detain Shiv Sena MLA Pratap Sarnaik’s son Vihang Sarnaik (in blue shirt) from their residence in Thane. https://t.co/Wd3RqIPi68 pic.twitter.com/YQQE2sRPDu
— ANI (@ANI) November 24, 2020