प्रशांत भूषण यांचा सर्वोच्च न्यायालयात माफी मागण्यास नकार

नवी दिल्ली – कार्यकर्ते आणि प्रसिद्ध विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी न्याययंत्रणेवर टीका करणाऱ्या दोन ट्‌विटसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात माफी मागण्यास नकार दिला. आपण न्यायालयात सादर केलेल्या आपल्या निवेदनावर आपण ठाम असल्याचे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. 

अप्रामाणिकपणे मागितलेली माफी म्हणजे माझ्या विवेकाचा आणि यंत्रणेचाही अवमान होतो, असे भूषण यांनी आपल्या पुरवणी निवेदनामध्ये म्हटले आहे. 

जेंव्हा न्यायालय आपल्या शुद्ध आचरणापासून विचलित होत असेल, तर कोर्टाचे अधिकारी म्हणून बोलण्याचे आपले कर्तव्य आहे, असा आपला विश्वास आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची अथवा कोणत्याही मुख्य न्यायाधीशांची प्रतिम मलीन करण्याची आपल्याला ईच्छा नाही. मात्र, राज्यघटना आणि नागरिकांच्या अधिकारांच्या पालनकर्ता म्हणून दीर्घकाळापासूनची न्यायालयाची भूमिका कायम राहावी म्हणूनच आपण ही विधायक टीका करत आहोत, असे भूषण म्हणाले.
न्यायालयाच्या अवमान प्रकरणात दोषी ठरवलेल्या भूषण यांना सहा महिन्यांची साधी कैद आणि 2 हजार रुपयांचा दंड अथवा दोन्ही अशी शिक्षा केली जाऊ शकते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.