केरळ सरकारच्या विरोधात अविश्‍वास प्रस्ताव

थिरूनंतपुरम – कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक आघाडीच्या वतीने केरळातील पिनारायी विजयन सरकारच्या विरोधात अविश्‍वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व्ही. डी. सतीशन यांनी आज विधानसभेत हा प्रस्ताव सादर केला.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे कार्यालय सोने तस्करी करणाऱ्या गॅंगने हायजॅक केले आहे. ते म्हणाले की, या प्रकरणात आपण कोणत्याही चौकशीचा सामना करण्यास तयार आहोत, असे एकीकडे मुख्यमंत्री विजयन सांगत असतानाच त्यांच्या सरकारच्या प्रिन्सिपल सेक्रेटरींची मात्र सोने तस्करी प्रकरणात तपास अधिकाऱ्यांकडून अनेक तास चौकशी सुरू होती.

सोने तस्करी करणाऱ्या टोळीचे मुख्यमंत्री कार्यालयाशी जवळचे संबंध असल्याची बाब सध्या केरळात बरीच चर्चेत असून या प्रकरणी सर्वच विरोधी राजकीय पक्षांनी सरकारला घेरून त्यांच्यावर आरोपांची सरबत्ती सुरू केली आहे.

विजयन यांच्या सरकारच्या विरोधात गेल्या चार वर्षात आणला गेलेला हा पहिलाच अविश्‍वास प्रस्ताव आहे. सभापतींनी या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी साडेपाच तासांचा अवधी दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.