नवी दिल्ली – भारताचे माजी बॅडमिंटनपटू आणि माजी ऑल इंग्लंड ओपन चॅम्पियन प्रकाश पादुकोण यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
करोनाची लागण झाल्यानंतर प्रकाश पादुकोण यांना 1 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही करोनाचा संसर्ग झाला होता, परंतु सर्वजण घरीच क्वॉरंटाइन होते.
65 वर्षीय पादुकोण 1980मध्ये ऑल इंग्लंड ओपन जेतेपद जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू ठरले होते. त्याच्या पुढच्या वर्षी ते अंतिम फेरीतही पोहोचले.
कोपेनहेगन येथे 1983च्या विश्वचषक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारे ते पहिले भारतीय खेळाडू ठरले होते. प्रकाश पादुकोण यांची मुलगी आणि बॉलीवूड स्टार दीपिकालाही करोना झाला होता.