ग्राउंड रिपोर्टींग : किडूक मिडूक अन्‌ मुलंबाळं वाचवण्यासाठी गाझात धावाधाव

गाझा/जेरूसलेम  – आपली चिल्ली पिल्ली बखोटीला मारून आणि घरातील सामान हातात घेऊन पॅलिस्टिनी नागरिक गाझा शहराच्या बाहेर धाव घेताना शुक्रवारी दिसत होते. इस्रायलच्या तोफगोळे आणि हवाई हल्ल्यांचा अक्षरश: वर्षाव केला. घुसखोरीची शक्‍यता असणाऱ्या दहशतवादी तळ आम्ही उद्‌ध्वस्त करत आहोत, असे इस्रायलने म्हटले आहे. या माऱ्यात एकाच कुटूंबातील सहा जणांचा मृत्यू झाला.

इस्रायलने आपली फौज सीमेवर तैनात केली आहेच. याशिवाय, हमास इस्लामिक दहशतवादी गटाशी संघर्ष तीव्र झाल्यानंतर राखीव दलातील नऊ हजार जवानही तैनात केले आहेत. या पॅलिस्टीनी दहशतवादी संघटनेने सुमारे 1800 रॉकेट डागली आहेत. तर इस्रायलने जवळपास 600 हवाई हल्ले केले. त्यात किमान तीन गगनचुंबी इमारती जमीनदोस्त झाल्या.

सीमेवर तैनात केलेल्या तोफदलाने जवळपासच्या भागात तोफगोळ्यांचा जोरदार मारा केला. गेल्या 15 दिवसांपुर्वी इस्रायलमध्ये धार्मिक दंगलीच्या घटना घडल्यानंतर जागतिक स्तरावर शस्त्रसंधीचे प्रयत्न होत असतानाही हमास आणि इस्रायलमध्ये जवळपास युध्द छेडले गेल्यासारखी स्थिती आहे.

लोड येथे अरब आणि ज्यू समाजामध्ये जोरदार संघर्ष उडाला. त्यानंतर तेथे अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. गाझा आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या युध्दात आतापर्यंत 119 जणांचा मृत्यू झाला. त्यात 31 मुले आणि 19 महिलांचा समावेश आहे.

इस्लामिक जिहादी दहशदवादी गट आणि हमासने त्यांचे 20 अधिकारी मारले गेल्याचे मान्य केले आहे. मात्र इस्रायलने हा आकडा खूप अधिक असल्याचे नमूद केले आहे. दुसऱ्या बाजूल इस्रायलच्या सात नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका सहा वर्षाच्या मुलाचा आणि एका लष्करी जवानाचा समावेश आहे.

इस्रायलच्या उत्तर पूर्व सीमेवरअसणाऱ्या गाझा शहराबाहेर संयुक्त राष्ट्रेने उभारलेल्या शाळेत नागरिकांनी धाव घेतली आहे. ट्रक, गाढवे पायी मिळेल त्या पध्दतीने आपले किडुक मिडूक, उशा, गाद्या, घेऊन नागरिक घराबाहेर बाहेर पडत आहेत.

“आमचं घर सोडायचा निर्णय आम्ही काल रात्रीच केला. पण इस्रायली विमानांतून तोफगोळ्यांचा जोरात मारा सुरू होता. त्यामुळे आम्ही सकाळपर्यंत थांबलो,” असे आपल्या 19 जणांच्या कुटुंबासह स्थलांतर करणाऱ्या हदायिआ मारूफ सांगत होत्या. त्या म्हणाल्या आम्ही आमच्या मुलांसाठी घाबरलो. ती खूप भेदरली होती आणि थरथरत होती, असे त्या म्हणाल्या.

गाझा पट्ट्यातील एका चार मजली इमारतीला इस्रायली हवाई हल्ल्यांनी अक्षरश: जमीनदोस्त केले. त्यात रफत तनमी हे आपली गर्भवती पत्नी आणि सात वर्षांखालील चार मुलांसह मरण पावले. ते झोपायला जाण्यापुर्वी थोडावेळ आधी म्हणजे रात्री 11च्या सुमारास हा हवाई हल्ला करण्यात आला.

या इमारतीचे मालक आणि त्यांच्या पत्नीचाही यात मृत्यू झाला, असे रफत यांचे बंधू फदी यांनी सांगितले. हे तर सामुहिक हत्यांकांड होते, आमच्या भावना व्यक्त करायला शब्द नाहीत असे त्यांचे आणखी एक नातेवाईक सदल्लाह तननी यांनी सांगितले.

लेफ्ट. कर्नल जोनाथन कॉनरिकस हे लष्कराचे प्रवक्ते म्हणाले, सीमेभोवती तैनात केलेल्या रणगाड्यांनी सुमारे 50 तोफगोळे टाकले. हवाई हल्ल्यासह आम्ही आखलेल्या व्याक रणनीतीचा तो भाग आहे. टेहळणीत सापडू नये म्हणून दहशतवादी बोगदे खणून त्यात लपून बसतात. ते नेस्तनाबूत करण्यासाठी हे हवाई हल्ले करण्यात येत आहेत.

नागरिकांची जीवितहानी कमीत कमी व्हावी आणि दहशतवाद्यांना लक्ष्य करण्याचा आमचा नेहमीप्रमाणे प्रयत्न होता. मात्र उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पूर्व सूचना देणे आम्हाला यावेळी शक्‍य झाले नाही.

अन्‌ संघर्षाला झाली सुरवात
हमासने एक दीर्घ पल्ल्याचे रॉकेट जेरूसलेमवर सोमवारी सोडले होते. पवित्र स्थळाजवळ असणाऱ्या पोलिसांच्या बंदोबस्ताविरोधात निदर्शने करणाऱ्यांना पाठींबा देण्यासाठी हे कृत्य करण्यात आले. त्यानंतर काही शे पॅलेस्टिनी नागरीकांना त्यांचे घर सोडायला ज्यू लोकांनी भाग पाडले. त्यानंतर इस्रायलने गाझातील शेकडो इमारतींना लक्ष्य बनवले. त्यामुळे दाट लोकवस्ती असणारे हे शहर हादरून गेले. हमासच्या दहशतवाद्यांनी जवळपास 1800 रॉकेट डागली. त्यातील सुमारे 400 रॉकेटचा नेम चुकला

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.