NPS Rule Changes| नॅशनल पेन्शन स्कीमबाबत मोठे बदल करण्यात आले आहेत. एप्रिल महिन्यापासून एनपीएस खात्यात लॉग-इन करण्यासाठी दुहेरी सुरक्षा प्रणाली अर्थात टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यानुसार आता खात्यातून पैसे काढण्यासाठी आधार कार्डद्वारे पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून ही नवी प्रणाली लागू होणार आहे. नुकतेच PFRDAने नवीन नियमांची माहिती देणारे परिपत्रक जारी केले.
एनपीएस सदस्यांना आधार पडताळणी आणि मोबाइलवर मिळालेल्या ओटीपीद्वारे लॉग इन करावे लागणार आहे. सध्या NPS सदस्यांना खात्यात लॉग इन करण्यासाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड आवश्यक आहे. याद्वारेच खात्यातील बदल आणि पैसे काढणे शक्य आहे.
सध्या, केंद्र आणि राज्य सरकारचे नोडल अधिकारी सीआरए प्रणालीमध्ये लॉग इन करण्यासाठी पासवर्ड आधारित प्रणालीवर अवलंबून आहेत. ते अधिक सुरक्षित करण्यासाठी ते आधार आधारित पडताळणीशी जोडले जाणार आहे. याद्वारे, खात्यात लॉग इन केल्यानंतर कोणत्याही प्रकारचे बदल आणि पैसे काढणे शक्य आहे.
NPS Rule Changes|
कसा करता येणार वापर?
PFRDA नुसार, आधार आधारित लॉग-इन पडताळणी NPS सदस्याच्या आयडीशी लिंक केले जाईल. यानंतर, आधारशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला ओटीपी टाकल्यानंतर एनपीएस खात्यात लॉग इन केले जाईल.
NPS Rule Changes|
लॉगिन पासवर्ड आधार पडताळणी आणि मोबाइल OTP द्वारे फक्त आधारच खाते ऑपरेट करू शकेल. इतर कोणीही ते ऑपरेट करू शकणार नाही. याशिवाय लॉगिन प्रक्रियेदरम्यान पाच वेळा चुकीचा पासवर्ड टाकल्यास, खाते लॉक केले जाऊ शकते.
हेही वाचा: