Prakash Ambedkar on Uniform Civil Code – उत्तराखंड विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये बुधवारी समान नागरी कायदा विधेयक – २०२४ बहुमताने मंजूर करण्यात आले. विधेयक मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ही घटना ‘ऐतिहासिक’ असल्याचे म्हंटले.
समान नागरी कायदा लागू केल्याने, सर्व समुदायांसाठी विवाह, घटस्फोट, जमीन, मालमत्ता आणि वारसा याबाबत कायदे समान असतील असं धामी सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी असा कायदा करण्याचा सरकारला अधिकारच नसल्याचा दावा केला आहे.
संविधानामध्ये नागरिकांना धर्माबाबतचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे, त्यामुळे हा कायदा लागू करण्यात आला तरी, कायद्याचे पालन करायचे की धर्माचे याबाबतचा अधिकार लोकांना असेल असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे. ते नागपूर येथे बोलत होते. । Prakash Ambedkar on Uniform Civil Code
संविधानाच्या कलम २५ व २६ मध्ये नागरिकाला, मूलभूत अधिकारांवर गदा न आणता धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारला समान नागरी कायदा आणायचा असल्यास त्यांना संविधान बदलावे लागेल असेही ते म्हणाले.
हा कायदा आणून सरकारला केवळ प्रोपोगंडा चालवायचा आहे असा आरोपही त्यांनी केला.
इतिहासात पहिल्यांदाच… । Prakash Ambedkar on Uniform Civil Code
दरम्यान उत्तराखंड सरकारने मंगळवारी विधानसभेमध्ये समान नागरी कायदा विधेयक मांडले. स्वातंत्र्यानंतर देशाच्या कोणत्याही राज्यामध्ये असे विधेयक मांडले जाण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
उत्तराखंडनंतर इतर भाजपशासित राज्यांमध्ये देखील समान नागरी कायदा आणला जातो का हे पाहणे आता औस्त्युक्याचे ठरणार आहे.