सलमानसोबत रोमान्स करणार प्रज्ञा जैसवाल

मुंबई – बॉलीवूड स्टार सलमान खान आणि आयुष शर्मा यांच्या आगामी “अंतिम ः द फायनल ट्रुथ’ चित्रपटाची घोषणा केल्यापासूनच चर्चेत आहे. या चित्रपटाची शूटिंग सुरू करण्यात आले आहे. तसेच चित्रपटाचा टीझरदेखील रिलीज करण्यात आला असून चाहत्यांनाही तो खूपच आवडला होता. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pragya Jaiswal (@jaiswalpragya)

या चित्रपटात सलमान एका शीख पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. आता या चित्रपटासाठी सलमानसोबतच्या नायिकेची निवड करण्यात आली आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे प्रज्ञा जैसवाल. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pragya Jaiswal (@jaiswalpragya)

प्रज्ञा भलेही बॉलीवूडमध्ये सलमानच्या ऑपोझिट भूमिका साकारत डेब्यू करणार असली तरी साउथमध्ये तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. साउथमध्ये तिची खूप मोठी फॉलोअगिं लाइन आहे. प्रज्ञाने 2014 मध्ये “विराट्टू आई डेगा’ चित्रपटातून डेब्यू केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pragya Jaiswal (@jaiswalpragya)

त्यानंतर तिने अनेक सुपरहिट तेलुगू चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत. प्रसिद्ध डायरेक्‍टर कृष यांच्या “कंचे’ चित्रपटासाठी प्रज्ञा जैसवालला फिल्मफेअर अवॉर्ड फॉर बेस्ट फीमेल डेब्यू- साउथचा पुरस्कार मिळालेला आहे. यानंतर प्रज्ञाने मागे वळून पाहिले नाही. ती आपल्या दमदार अभिनयाने लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवित आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pragya Jaiswal (@jaiswalpragya)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.