प्रभात इफेक्ट : अखेर त्या चिखलयुक्त रस्त्यावर मुरूमीकरण

उद्योगपती रमेश गुगळे. दिलीप गुगळे यांनी घेतला पुढाकार

जामखेड: पावसाने जामखेड शहरातील रस्त्यांवर पाणी साचलेले आहे. तसेच अनेक भागांत चिखल झालेला आहे. शहरातील तहसिल कार्यालयामागील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर साचलेल्या चिखलातून वाट काढत मतदार हे मतदान केंद्राकडे जात असल्याचे वृत्त नुकतेच दैनिक प्रभात ने संकेतस्थळावर प्रसिद्ध केले होते. हे वृत्त प्रसिद्ध होताच जामखेड शहरातील उद्योगपती रमेश गुगळे व दिलीप गुगळे यांनी तात्काळ पुढाकार घेऊन या रस्त्यावर मुरूम टाकून मतदारांना वाट करून दिली आहे.

सोमवारी सकाळी मतदान केंद्रावर जाण्यासाठी मतदारांना अक्षरशः चिखलातून वाट शोधावी लागली. शहरातील तहसील कार्यालयामागील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर चिखल झाल्याने वयोवृद्ध व्यक्तीना चालताना मोठी कसरत करावी लागत होती. वयोवृद्ध मतदारांना चिखलातून पायी चालत मतदान केंद्रावर जावे लागत होते.

पावसामुळे पडलेल्या खड्डे प्रशासनाने बुजवने अपेक्षित होते. मात्र खड्डे तसेच ठेवल्याने या खड्ड्यात पाणी साचून चिखल झाला होता. याबाबत दैनिक प्रभातने जामखेडमध्ये मतदान केंद्राकडे जाण्यासाठी मतदारांची कसरत अशा मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते.

जामखेडमध्ये मतदान केंद्राकडे जाण्यासाठी मतदारांची कसरत

हे वृत्त प्रसिद्द होताच शहरातील एच यु गुगळे उद्योग समूहाचे उद्योगपती रमेश गुगळे व दिलीप गुगळे यांनी तातडीने दखल घेऊन 5 ते 6 ट्रॅक्टरव्दारे या रस्त्यावर मुरूम टाकून मतदारांना वाट करून दिली. त्याच्या या कामाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.