मुंबई – ‘पुनीत बालन स्टुडिओज्’ची नवीकोरी निर्मिती असलेल्या जग्गू आणि जुलिएट चित्रपटातील दुसरं गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं होत. अजय अतुल यांचा दमदार स्वॅग असलेलं गाणं सध्या तरुणाईला चांगलीच भुरळ पडतंय. सोशल मीडियावर या गाण्याने थोड्याच अवधीत एक मिलयनचा टप्पा पार केलाय.
‘येतोय भावी आमदार..’ हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडतंय. अजय अतुलचं धमाकेदार म्युझिक या गाण्यात ऐकायला मिळत आहे. तसेच, यामध्ये अभिनेता उपेंद्र लिमये आणि अमेय वाघचा भन्नाट डान्स दिसून येत आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत असून, प्रेक्षकांचा गाण्याला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.
खास तरुणाईला आकर्षित करणार या दमदार गाण्यावर सध्या अनेक सोशल मीडिया इन्फ़्युसर रिल्स बनवताना दिसताहेत. जग्गू आणि जुलिएट हा चित्रपट 10 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची हटके नावामुळे खूपच चर्चा होती.
यापूर्वी जग्गू आणि जुलिएटमधील ‘मना तुझ्या विना.!’ या गाण्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. ‘पुनीत बालन स्टुडिओज्’ने यापूर्वी निर्मिती केलेला सामाजिक विषयावरील ‘मुळशी पॅटर्न’च्या सुपरहिट यशानंतर आता ही लव्हस्टोरी 10 फेब्रुवारीला प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.