Animal Movie : अभिनेता रणबीर कपूरचा ( ranbir kapoor ) ‘अॅनिमल’ ( Animal ) चित्रपट रिलीज होण्याआधीच त्याची बरीच चर्चा होती. रणबीरला पहिल्यांदाच धमाकेदार गँगस्टर अवतारात पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. टीझर-ट्रेलरवरूनच चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करणार अशी शक्यता वर्तवली जात होती.
या चित्रपटाने ऍडव्हान्स बुकिंगचाही रेकॉर्ड तोडला. हा चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून पहिल्या दिवसापासूनच चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालण्यास सुरुवात झाली आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘अॅनिमल’ने रणबीर कपूरला अशा शैलीत पडद्यावर आणले आहे जे आजपर्यंत दुसरा कोणताही चित्रपट करू शकला नाही.
या जल्लोषात लोकांचा मूड इतका तयार झाला होता की चित्रपटाचे ऍडव्हान्स बुकिंग सुरू होताच तिकीटांची जोमाने विक्री सुरू झाली. आगाऊ बुकिंगद्वारे या चित्रपटाने 34 कोटींहून अधिक कमाई केली होती.
‘अॅनिमल’ला मोठी ओपनिंग मिळणार हे निश्चित होते, पण चित्रपटाला अपेक्षेपेक्षाही मोठी ओपनिंग मिळाली. पहिल्याच दिवशी 60 कोटींहून अधिक कमाई केली आहे. एकट्या हिंदी आवृत्तीतून चित्रपटाचे कलेक्शन 50 कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, सध्या अॅनिमल चित्रपटामधील फायटिंग सीनची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या सीनमध्ये अजय-अतुलच्या एका मराठमोळ्या गाण्याचा वापर करण्यात आला आहे. “डॉल्बी वाल्या” गाण्याचा तडका यावेळी प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला आहे.
तसेच, चित्रपटात उपेंद्र लिमये ( upendra limaye ) या मराठमोळ्या अभिनेत्यांनी एक महत्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात उपेंद्र हे रणबीरला एक मशीन गन दाखवतात. जी मशीन गन महाराष्ट्रामध्ये असेंबल करण्यात आलेली असते. सध्या या सीनची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. उपेंद्र लिमयेच्या दमदार एन्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली असल्याचं यातून दिसून आलं आहे.