रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सलग 22व्या दिवशीही सुरूच आहे. या युद्धात रशिया युक्रेनवर दिवसेंदिवस आक्रमक होत आहे. रशियाने मारियोपोलमधील या शहरातील एका थिएटरवर शक्तीशाली बॉम्ब टाकला आहे. या बॉम्बहल्ल्यात मोठी जीवितहानी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून थिएटरमध्ये सुमारे 1000 ते 1200 लोकांनी आश्रय घेतलेला होता. अशी माहिती युकेनियन परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
‼️This is all that remains of the Drama Theater in #Mariupol
According to local media, up to 1,000 people could have been inside the building. All of them are now under the rubble of the building. The exact number of casualties is still unknown. pic.twitter.com/4L3D8lt39E
— NEXTA (@nexta_tv) March 16, 2022
या थिएटरमध्ये शेकडो नागरिक आश्रय घेत होते, ज्यामध्ये 80 टक्के मुले आणि महिला होत्या. थिएटरवर शक्तिशाली बॉम्ब टाकला असल्याची माहिती युकेनियन परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. या थिएटरमध्ये 1000 ते 1200 लोकांनी आश्रय घेतल्याचा दावा मारियोपोलचे उपमहापौर सर्गेई ऑर्लोव्ह यांनी केला आहे.
रशियाने मात्र युक्रेनच्या थिएटरवर बॉम्बहल्ला केलेल्या दाव्याचे खंडन केले आहे. रशियन सैनिकांनी थिएटरवर हल्ला केलेला नाही. तर या हल्ल्यामागे युक्रेनमधीलच अझोव्ह बटालीयन या अतिउजव्या संघटनेचा हात आहे, असा असे रशियन संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.