मुंबई – हॉट अभिनेत्री पूनम पांडे नेहमीच इंस्टाग्रामवर सक्रिय असते. तिच्या बोल्ड फोटो शूटमुळे ती नेहमी चर्चेत असते. नशा चित्रपटातून पूनम पांडे हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पूनमला इन्स्टाग्रामवर 30 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. मात्र यावेळी ती तिच्या फोटोशूटमुळे नाहीतर लग्नामुळे चर्चेत आहे.
हॉट अभिनेत्री अशी ओळख असलेल्या पूनम पांडेचा विवाह झाला आहे. बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत तिचं लग्न झालं आहे. पूनम पांडेचा बॉयफ्रेंड सॅम बॉम्बे याने त्याच्या आणि पूनमच्या लग्नाचे फोटो इन्स्टा अकाऊंटवर शेअर केले आहेत दोघांनीही खास डिझाइन केलेले ड्रेस लग्नानिमित्त घातले आहेत.
अभिनेत्री पूनम पांडेने नशा या सिनेमाद्वारे तिचं करिअर सुरु केलं होतं. मात्र हॉट व्हिडीओ पोस्ट करण्यात ती अग्रेसर आहे. तिला इन्स्टावर फॉलो करणारा खास असा तिचा फॅन फॉलोईंग आहे
पूनम पांडे आणि सॅम बॉम्बे यांनी जुलै महिन्यात साखरपुडा केला होता. पूनम पांडेच नाही तर तिचा बॉयफ्रेंड आणि नवरा सॅम बॉम्बे हादेखील सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय आहे