पणजी- मॉडेल पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे या दोघांना कलांगुट पोलिसांनी आज अटक केली. ते दोघे सिकेरी येथे एका रिसॉर्टमध्ये राहत होते. त्या दोघांवरही कॅनकोना पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता मात्र , आता या प्रकरणात दोघांनाही जामीन मिळाला आहे. पूनम पांडे आणि सॅम बॉम्बे यांना कॅनकोना ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासने गुरुवारी रात्री नऊ वाजता जामीन मंजूर केला
दरम्यान, कॅनकोनाच्या पाटबंधारे खात्याच्या चापोली धरणावर वादग्रस्त मॉडेल पूनम पांडे हिने शूट केलेला पॉर्न व्हिडिओ पोलिसांना चांगलाच भोवला होता. हा व्हिडीओ शूट होताना पूनमला संरक्षण दिल्याचा आरोप ठेवून कॅनकोनाचे पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्यासह 5 जणांना निलंबित करण्यात आले आहे. कॅनकोना पोलीस स्थानकावर पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे या दोघांविरुद्ध अश्लील व्हिडीओ शूट करणे आणि सरकारी मालमत्तेत घुसखोरी करणे या आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आला होता.