नवी दिल्ली – भांडवल सुलभता कमी करून व्याजदर वाढीचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर जागतिक बाजारात सोन्याचे दर वधारले. भारतीय बाजारात गुरुवारी सोन्याचा दर 209 रुपयांनी वाढून 47,405 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
दिल्ली सराफात तयार चांदीचा दर 617 रुपयांनी वाढून 60,179 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,785 डॉलर व चांदीचा दर 22.16 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. गेल्या पंधरवड्यात सोन्याच्या दरात घट झाली होती.
आता डॉलर कमकुवत होण्याची शक्यता वाढल्यामुळे सोन्याचा दर वाढत असल्याचे एचडीएफसी सेक्युरिटीजचे विश्लेषण तपन पटेल यांनी सांगितले.