Cm Eknath Shinde। अभिनेता गोविंदा आहुजा यांनी गुरुवारी (दि. 28) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी भगवा झेंडा हातात देत गोविंदाचे पक्षात स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती.
पुन्हा राजकारणात येईल असं वाटलं नव्हतं. 14 वर्षांनंतर पुन्हा राजकीय प्रवासाला सुरुवात होत आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून मुंबईचा विकास झाला आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडणार, अशी प्रतिक्रिया गोविंदा यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांचे आभारही मानले.
दरम्यान, गोविंदा यांच्या पक्ष प्रवेशानंतर अभिनेत्री करिना कपूर, अभिनेत्री करिष्मा कपूर या सुद्धा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, अभिनेत्री करिष्मा कपूर आणि करिना कपूर या दोन्ही बहिणींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर जावून भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच काँग्रेस नेते संजय निरुपम देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हे वाचाल का ? ‘जिंदगी इम्तिहान लेती है’ गाण्याचे गायक कमलेश अवस्थी यांचे निधन; संगीतविश्वातून वाईट ‘बातमी’